
Talk18 मराठी प्रतिनिधी :5 जून 2026 (शुक्रवार) :
माळशिरस तालुक्यातील खुडूस येथे शिवसेना नेते तथा माजी आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्र आबा ठवरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी स्थानिक सामाजिक, राजकीय व विकासकामांबाबत मनमोकळा संवाद साधण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना नेते तथा पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने-पाटील, अँड. शहाजी काका ठवरे, तात्यासाहेब ठवरे, गोटू पाटील, हनुमंत ठवरे, अक्षय आण्णा ठवरे, प्रवीण लोखंडे, चैतन्य नरळे आणि संग्राम ठवरे यांच्यासह शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीदरम्यान तालुक्यातील विकासकामे, जनहिताचे प्रश्न आणि आगामी सामाजिक उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपस्थितांकडून देण्यात आली. तसेच या भेटीमुळे खुडूस परिसरात राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
– Talk18 मराठी
“तुमच्या गावातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, सर्वात आधी.”


