Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर येथे स्व. प्रतापसिंह शंकराव मोहिते पाटील यांची जयंती उत्सव साजरी

सदाशिवनगर | गुरुवार, दि. २५ जून २०२६

राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री तथा लोकनेते स्व. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. रामदास कर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे संचालक सुनील माने, रामभाऊ खुळे, दादा पाटील, कार्यकारी संचालक अभिजीत डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, मुख्य शेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड, चीफ इंजिनिअर समाधान कागदे, सिव्हिल इंजिनिअर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार चळवळीतील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, शेतकरी हितासाठी केलेले कार्य आणि ग्रामीण विकासातील योगदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button