आनंदनगर येथे १४ मार्चला “सहकार महर्षी केसरी” भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन

Talk18 मराठी प्रतिनिधी :
सहकार महर्षी केशररी यांच्या जयंतीनिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत शिवकीर्ती शेतीफार्म, आनंदनगर (अकलूज–चाकोरे रोड) ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे.
या बैलगाडा शर्यतीत विजेत्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी १,५०,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १,१०,००० रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी ७१,००० रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकासाठी ६१,००० रुपये व चषक आणि पंचम क्रमांकासाठी ५१,००० रुपये व चषक देण्यात येणार आहेत. तसेच सहावा क्रमांक ३१,००० रुपये, सातवा क्रमांक २१,००० रुपये आणि आठवा क्रमांक ११,००० रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी १००० रुपये ठेवण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कार्यक्रमाला मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील (चेअरमन, स. म. शं. मो. पा. सह. सा. का. लि., शंकरनगर), मा. श्री. मदनसिंह मोहिते-पाटील (सभापती, कृ. उ. बा. समिती अकलूज), मा. श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील (विधान परिषद आमदार), मा. श्री. धैर्यशील मोहिते-पाटील (लोकसभा खासदार) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मा. श्री. उत्तमराव जानकर (विधानसभा आमदार) यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट लि., शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलगाडा शर्यतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


