Uncategorizedअकलूजमहाराष्ट्रविशेष

माळशिरस तालुक्यात बनावट विदेशी मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Talk18 मराठी l आण्णा भोसले

. ७ मार्च २०२६ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग माळशिरस यांनी बनावट विदेशी मद्याच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस तसेच अधिनस्त अधिकारी व जवानांच्या पथकाने पानीव गावच्या हद्दीत डोंबाळवाडी ते पानीव रोडवर सापळा रचला.


या कारवाईदरम्यान अवैधरित्या बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणारे एक चारचाकी वाहन पकडण्यात आले. वाहनामध्ये १८० मिली क्षमतेच्या इम्पेरिअल ब्ल्यू व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या एकूण ७६८ बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत १३८.२४ बल्क लिटर बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.


जप्त करण्यात आलेल्या मद्याची अंदाजे किंमत १,८०,४८० रुपये असून वाहनाची किंमत ४,५०,००० रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ६,३०,४८० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.


ही कारवाई मा. सागर धोमकर (विभागीय उपायुक्त, पुणे) व मा. भाग्यश्री जाधव (अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले, बाळासो नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. ए. बिराजदार, तसेच जवान प्रविण पुसावळे, देविदास चौगुले, गजानन जाधव, योगेश पाटील, पराडे फडतरे आणि वाहन चालक मारुती जडगे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button