Uncategorized

शिवसेनेचे नूतन सदस्य मच्छिंद्र ठवरे, बाबासाहेब माने पाटील व दत्ता भैय्या मगर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदिच्छा भेट

Talk18 मराठी — प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद – पंचायत समितीच्या निवडणुकीं मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून विजयी झालेले मच्छिंद्र आबा ठवरे पाटील, बाबासाहेब माने पाटील व दत्ता भैय्या मगर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची सदिच्छा भेट घेतली.

मुंबई येथे झालेल्या या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी नूतन सदस्यांचे मनापासून स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीवर विकासकामांना गती देण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्यासाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

या स्नेहपूर्ण भेटीत विविध विकासकामांबाबत चर्चा झाली. शिंदे साहेबांच्या आत्मीय स्वागतामुळे नूतन सदस्य भारावून गेले असून, “जनतेच्या विश्वासाला न्याय देत विकासाचा वेग वाढवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी काळात माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्हा पातळीवर विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button