माढा लोकसभा मतदारसंघातील शक्तीपीठ महामार्ग संदर्भातील महत्त्वाची बैठक

Talk18 मराठी l आण्णा भोसले :
माढा लोकसभा मतदारसंघातील शक्तीपीठ महामार्ग संदर्भात रविवारी अकलूज येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार असून, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ही बैठक रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे आयोजित करण्यात आली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर सध्या परिसरात मोठी चर्चा सुरू असून, शेतकरी व नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आणि पुढील भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.


