माळशिरस येथील “यशोदा निवास” येथे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट; रेश्माताई माने-पाटील यांचा सन्मान

Talk18 मराठी l माळशिरस : माळशिरस येथील “यशोदा निवास” येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री Bharat Gogawale (रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभाग) यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान तालुक्यातील विविध विकासकामे, रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे तसेच फलोत्पादन क्षेत्रातील संधी याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी गोरडवाडी पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या विजयी उमेदवार सौ. रेश्माताई बाबासाहेब माने-पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून मंत्री गोगावले यांचे स्वागत केले. उपस्थित कार्यकर्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.

या प्रसंगी नामदार गोगावले यांच्या हस्ते नूतन पंचायत समिती सदस्य रेश्माताई माने-पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्य गौतम बाबा माने-पाटील व बाबासाहेब माने-पाटील यांनीही मंत्री गोगावले यांचा सत्कार करून स्वागत केले. तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास माळशिरस तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदिच्छा भेटीमुळे तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने नवे संकल्प आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


