शिवजयंती निमित्त श्रीपूर येथे जिगर ग्रुप व राजरत्न नाईकनवरे मित्रपरिवार यांच्या वतीने ‘शाहिरी शिवगर्जना’ कार्यक्रम

श्रीपूर, प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीपूर येथे ‘शाहिरी शिवगर्जना’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शाहीर पृथ्वीराज देवानंद माळी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शिवचरित्रावर आधारित पोवाडे, शौर्यगाथा तसेच मराठमोळी लोकगीते सादर केली जाणार आहेत. शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणादायी गाथा शाहिरीच्या माध्यमातून ऐकण्याची संधी श्रीपूरकरांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जिगर जिगर ग्रुप व राजरत्न नाईकनवरे मित्र परिवार, श्रीपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अशी माहिती जिगर जिगर ग्रुप व राजरत्न नाईकनवरे मित्र परिवार, श्रीपूरचे संस्थापक अध्यक्ष राजरत्न नाईकनवरे यांनी Talk18 मराठीशी बोलताना दिली.


