Uncategorizedअकलूजदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

चांदापुरी येथे भिमक्रांती तरुण मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Talk18 मराठी l आण्णा भोसले :

चांदापुरी – महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधत भिमक्रांती तरुण मंडळ, चांदापुरी यांच्या वतीने एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चांदापुरी व पठाणवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील तसेच प्रतापसिंह विद्यालय (काळेवस्ती) येथील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवण्याचा आणि महापुरुषांच्या विचारांची रुजवण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष अक्षय देठे, सचिव समाधान साबळे, उपाध्यक्ष सागर सरतापे, खजिनदार हेमंत जाधव यांच्यासह मार्गदर्शक प्रा. जयकुमार सरतापे, तसेच मुख्याध्यापक मारकड सर आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रा. जयकुमार सरतापे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची सखोल माहिती देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “शिक्षण हेच खरे शस्त्र आहे,” असा संदेश देत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भविष्यातही महापुरुषांच्या जयंती निमित्त अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button