महाराष्ट्र

चांदापुरी येथे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची सौ.ठवरे व सौ.माने पाटील यांच्या समर्थनार्थ कॉर्नर सभा

Talk18 मराठी आण्णा भोसले l चांदापुरी –

येथे निमगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. लीलावती मच्छिंद्र ठवरे व सौ. रेश्माताई बाबासाहेब माने पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली. आपल्या भाषणात त्यांनी चांदापुरी गावातील प्रलंबित अडचणी सोडवण्याचा शब्द देत विकासकामांना गती देण्याची ग्वाही दिली.

तसेच त्यांनी गावकऱ्यांना आवाहन करत म्हटले की, सौ. लीलावती ठवरे आणि रेश्माताई माने पाटील यांच्या धनुष्यबाण चिन्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, जेणेकरून स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्व उभे राहील.

सभेला माजी सभापती मछिंद्र आबा ठवरे, जेष्ठ नेते केशवराव पाटील, सरपंच जयवंत अण्णा सूळ, उपसरपंच हनुमंत सरतापे, सचिन रणनवरे, बाबासाहेब माने पाटील, विजयसिंह पाटील, विलास धुलूगडे, बाळू अण्णा कोपनर, अप्पा पाटील, भगवान बापू सूळ, शिवाजी पाटील, धुलूगडे सर, विजय निकम, अप्पा सरतापे, बापू लोखंडे, सत्यवान देठे, सरवदे, हणमंत लोखंडे, अजिनाथ कवळे, तुषार ठवरे पाटील, माऊली कोपनर, हमभाव मिसाळ, अजिनाथ जगदाळे गौरिहार बोडरे, शंकर कवळे, हणमंत गोरवे, नाथा सरक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सभेमुळे ठवरे व माने पाटील यांच्या प्रचाराला निर्णायक बळ मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button