
Talk18 मराठी माळशिरस | प्रतिनिधी:
माळशिरस नगरपंचायतच्या नूतन नगराध्यक्षपदी श्री. रघुनाथ पांडुरंग चव्हाण यांची निवड झाल्यानंतर शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्याचे युवा नेते तथा ग्रामपंचायत धानोरेचे माजी सरपंच श्री. जीवनभैय्या उत्तमराव जानकर यांनी श्री. चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी माळशिरस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम भाऊ देशमुख, माजी सरपंच विष्णुपंत केमकर, माजी नगरसेवक मारुती देशमुख, अशोक दादा देशमुख, अॅड. कोळेकर, दिनेश धाईंजे,सुहास थोरात,सर्जेराव जानकर,महादेव देशमुख,किरण सावंत,समाधान भोसले,अमोल पवार,अनिल सावंत, प्रवीण केमकर, एमडी सिद, श्रीरंग तरडे, ठाकरे गटाचे अशोक देशमुख,सचिन देशमुख बाजीराव थोरात, लखन पाटोळे,शशिकांत साळुंखे, हैदर मुलाणी यांच्यासह नगरसेवक, तसेच तुकाराम देशमुख मित्रपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नूतन नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण हे माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम भाऊ देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जातात.”

नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रघुनाथ चव्हाण यांना विविध सामाजिक, राजकीय व नागरिक स्तरातून शुभेच्छा दिल्या जात असून, त्यांच्या निवडीमुळे माळशिरस शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
— Talk18 मराठी


