Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषसामाजिक

अकलूज शहराच्या विकासासाठी महत्त्वाची बैठक; वाहतूक, रस्ते व वीज प्रश्नांवर थेट चर्चा

Talk18 मराठी l आण्णा भोसले :

अकलूज शहराची वाढती व्याप्ती आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्या तसेच नागरिकांच्या विविध अडचणींवर ठोस उपाययोजना करण्यासाठी गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता सदाभाऊ सांस्कृतिक भवन (विजय विद्यार्थी वसतिगृह) येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, नगराध्यक्षा रेश्माताई आडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, वीज समस्या यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण व्हावे यासाठी प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यामध्ये उपविभागीय अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, RTO अमरसिंह गवारे तसेच सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

अकलूज नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पाटील आणि एस.टी. डेपो मॅनेजर प्रमोद शिंदे यांचीही उपस्थिती या बैठकीत राहणार आहे.

दरम्यान, “अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. तरी सर्व नागरिक, व्यापारी, डॉक्टर आणि व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.

अकलूजमधील नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी ही बैठक एक प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button