सौ. सविता विजयसिंह पाटील मैदानात; गोरडवाडी पंचायत समिती गणात चुरस वाढली

Talk18 मराठी l आण्णा भोसले चांदापुरी :
गोरडवाडी पंचायत समिती गणातून चांदापुरी गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. सविता विजयसिंह पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय समीकरणे वेगळ्या वळणावर आली आहेत.
सौ. सविता पाटील या चांदापुरीचे गावचे ज्येष्ठ नेते केशवराव उर्फ लिंगा पाटील यांच्या सून असून, पाटील कुटुंबाचा राजकीय, आणि सामाजिक वारसा चालवतात.केशवराव उर्फ लिंगा पाटील हे गेली अनेक वर्षे मोहिते पाटील कुटुंबाबरोबर एकनिष्ठ राहिलेले असून, सक्रिय राहिलेले नेतृत्व आहे. मार्केट कमिटी तसेच शंकर सहकारी साखर कारखाना यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर संचालक म्हणून त्यांनी जबाबदारीने काम पाहिले आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख असून, मोहिते पाटील समर्थक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आहे.याच पार्श्वभूमीवर, गोरडवाडी गणातून अपक्ष उमेदवारी ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, अनुभव, विश्वासार्हता आणि स्थानिक प्रश्नांची जाण या बळावर सौ. सविता पाटील यांची उमेदवारी मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.ग्रामपंचायत सदस्य म्हणून केलेले काम, गावपातळीवरील थेट संपर्क आणि पाटील कुटुंबाचा समाजकारणातील अनुभव यामुळे ही लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.एकंदरीत,
गोरडवाडी पंचायत समिती गणात अपक्ष शक्तीचा ठसा उमटवणारी ही उमेदवारी आगामी निवडणुकीत कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण संपूर्ण निमगाव जिल्हा परिषद गटामधील प्रमुख नेत्यांचे लक्ष लागले आहे.


