किरण वाघमारे यांना ‘सर्वोत्कृष्ट समतादूत पुरस्कार’ प्रदान

Talk18 मराठी ल आण्णा भोसले :
महाड येथील क्रांती भूमी येथे 19 व 20 जानेवारी रोजी झालेल्या दोन दिवसीय समतादूत राज्यस्तरीय कार्यशाळेत खुडूस (ता. माळशिरस) येथील किरण वाघमारे यांना सर्वोत्कृष्ट समतादूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे — महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत प्रदान करण्यात आला. सामाजिक समता, जनजागृती आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना किरण वाघमारे यांनी भावनिक शब्दांत सांगितले की,
“हा पुरस्कार मी माझ्या आईला समर्पित करतो.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये विशेष भावनात्मक वातावरण निर्माण झाले.
हा सन्मान सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे आणि विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल माळशिरस तालुक्यासह संपूर्ण परिसरातून किरण वाघमारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
— प्रतिनिधी
Talk18 मराठी


