Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

बुधवार, दि. 23 सप्टेंबर 2026

Talk18 मराठी | सदाशिवनगर प्रतिनिधी :

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखान्याची 59 वी अधिमंडळाची 2025-26 या अर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी काकासाहेब, आक्कासाहेब व पप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद पंढरीनाथ गुलाब मोहिते बांगार्डे यांचे शुभहस्ते हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार तथा श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, व्हा चेअरमन मिलिंद कुलकर्णी,संचालक मंडळ तसेच अँड. शिवाजीराव पिसाळ, शिवामृत दूध संघाचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर, सहकार महर्षि साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब आप्पा मगर, गोविंद भाऊ पवार, माजी सभापती रावसाहेब पराडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती, अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, पं. स. सदस्य मानसिंग मोहिते, लक्ष्मण पवार, माजी उपसभापती सुभाष कुचेकर , म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विलास आबा माने , शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले, तर सभेचे अहवाल व विषय वाचन कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख यांनी केले व आभार संचालक दत्तू काका रणनवरे यांनी मानले.

यावेळी सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, शिवामृत दुध संघांचे संचालक, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, जि. प. सदस्य व पं. स.सदस्य, सरपंच, उपसरपंच, शेतकरी सभासद, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://youtu.be/4eiabfqTwnY

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button