माळखांबीवरील अन्यायाविरोधात बोरगाव जिल्हा परिषद गट स्वबळावर लढणार – बच्चन साठे

माळशिरस | प्रतिनिधी – Talk18 मराठी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा होताच माळशिरस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः बोरगाव जिल्हा परिषद गटात माळखांबी गावावर आतापर्यंत झालेल्या अन्यायाविरोधात येत्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा ठाम निर्णय बच्चन साठे यांनी घेतला आहे. आज रोजी उमेदवारी अर्जासह निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
निवडणुका जाहीर होताच जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्यांची धावपळ सुरू झाली असून, निवडणूक लागली की समाज आठवणारे नेते पुन्हा एकदा पदाच्या खुर्चीसाठी सक्रिय झाले आहेत. कोणाकडे जावे, कोण तिकीट देईल, यासाठी राजकीय बेरजेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
मात्र आतापर्यंत झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माळखांबी गावाला सातत्याने डावलण्यात आले, अशी तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर यावेळी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी माळखांबी ठामपणे प्रयत्न करणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सदस्याची भूमिका – विकासाचा दृष्टिकोनबच्चन साठे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद सदस्य हा केवळ पदापुरता मर्यादित न राहता ग्रामीण विकासाचा प्रतिनिधी असावा.शेती व पशुसंवर्धन : शेती उत्पादन वाढीसाठी योजना राबवणे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाला चालना देणेशिक्षण व आरोग्य : ग्रामीण भागातील शैक्षणिक व आरोग्य सुविधा सक्षम करणेसमाजकल्याण : मागास व दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या योजना राबवणे, अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्नमूलभूत सुविधा : पाणीपुरवठा, रस्ते बांधणी, स्वच्छता व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणेप्रशासकीय देखरेख : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशासनावर देखरेख ठेवत शासन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणेजनतेच्या सेवेसाठी स्वबळाचा निर्धारजनतेची सेवा करण्याची तीव्र इच्छा असल्यानेच ही जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला आहे, असे बच्चन साठे यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीत बोरगाव गटातील जनता सेवा करण्याची संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.





