जिजाऊ जयंतीनिमित्त संग्राम नगरमध्ये ‘जिजाऊ नगर’ कॉलनीचे दिमाखदार नामकरण
जिजाऊ जयंतीनिमित्त प्रेरणादायी सोहळा; प्रा. डॉ. मिनाक्षी जगदाळे यांचे प्रभावी विचार
Talk18 मराठी आण्णा भोसले अकलूज : संग्रामनगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या कॉलनीस ‘जिजाऊ नगर’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात आले. या कॉलनीचे उद्घाटन अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक माननीय सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
🔸 *प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांचे प्रेरणादायी विचार*
कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याचा सखोल आणि प्रेरणादायी आढावा घेतला. आपल्या प्रभावी भाषणात त्या म्हणाल्या की,
“जिजाऊ नगर हे केवळ एका कॉलनीचे नाव नसून प्रेरणादायी विचारांचे प्रतीक आहे. राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची शिकवण या नावातून प्रतिबिंबित होते. हे नाव इतिहासाची आठवण जिवंत ठेवणारे, महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.
”पुढे त्या म्हणाल्या की,
“समाजात नैतिक मूल्ये रुजवणे, भावी पिढीला आदर्श जीवनमूल्यांची ओळख करून देणे आणि संस्कारक्षम समाज घडवणे हा जिजाऊ नगर नावामागील खरा उद्देश आहे. जिजाऊ नगरमुळे परिसराला ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख प्राप्त झाली असून हे नाव सदैव अभिमानाने उच्चारले जाईल.”
🔸 सरपंच अजित रेवंडे यांचे मनोगत
यावेळी संग्राम नगर ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री. अजित रेवंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ग्रामपंचायतीच्या विकासकामांची माहिती देत त्यांनी जिजाऊ नगर उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
🔸 मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास संग्राम नगरचे सरपंच श्री. अजित रेवंडे, उपसरपंच श्री. राचकर, प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख माननीय श्री. अमोल शिवाजी जगदाळे, युवासेना जिल्हाध्यक्ष श्री. गणेश इंगळे, श्री. सचिन गायकवाड, चि. समर्थ जगदाळे, श्री. राजू सोनवणे, श्री. अनिल कदम, श्री. माने साहेब, श्री. शहाजी वाघ, डॉ. संतोष काटकर, डॉ. मंगेश शिंदे, डॉ. विशाल साळुंखे, श्री. अभिजीत वाघ, श्री. आकाश मुंजाळ, श्री. गणेश कदम, श्री. सचिन लोखंडे, श्री. खाडे, श्री. सतीश रेवंडे, श्री. बबन शेंडगे, श्री. सचिन रेवंडे, श्री. हनुमंत रेवंडे, श्री. गुणवंत अंधारे, श्री. सुमंत अंधारे, श्री. राजेश कांबळे, श्री. सावंत साहेब, जाधव, शकील भाई दस्तगीर, जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष सौ. सुषमा पाटील, सौ. पल्लवी काटकर, सौ. विद्या मुंगुसकर, सौ. विद्या साळुंखे, सौ. मनीषा कदम, सौ. विनोदिनी अंधारे, सौ. वाघ, कु. उज्वला आडणे, सौ. रेशमा ननवरे, सौ. देशमुख आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अमोलशेठ जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. राजू सोनवणे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



