सभापती दत्ताभैया मगर यांच्या वतीने आगीत बाधित झालेल्या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याची मदत

Talk18 मराठी l पिलीव :
झिंजेवस्ती येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत श्री. जगन्नाथ नरळे यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नरळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे सभापती दत्ताभैया मगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नरळे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या कठीण प्रसंगी धीर दिला. तसेच शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देत अवघ्या प्रत्यक्ष मदत पोहोचवून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
यावेळी माळशिरस तालुक्याचे सभापती यांच्या सुविद्य पत्नी पुजाताई दत्ताभैय्या मगर यांच्या हस्ते नरळे कुटुंबाला संसार उपयोगी साहित्त्याची मदत करण्यात आली.

यावेळी बाबुराव कदम (मार्केट कमिटी संचालक), प्रकाश पाटील (मा. सरपंच), वस्ताद मोहन मदने पाटील, शामराव गलांडे (मा. उपसरपंच), किशोर कदम (मा. उपसरपंच), राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरसचे प्रवक्ता लहू पाटील, युवानेते रंजीत पाटील, विश्वनाथ मगर (बापूराव), संजय मगर, जयसिंग मोरे, प्रदीप मगर, शब्बीर मुलानी, महेश मगर, यश सुर्वे, सुरज मगर आदी मान्यवर उपस्थित होते.



