Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त वेळापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण व गुणवंतांचा सत्कार

Talk18 मराठी l २९ ऑगस्ट शनिवार

वेळापूर प्रतिनिधी :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या ६९व्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), माळशिरस तालुक्याच्या वतीने वेळापूर येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि कर्तृत्वाचा सन्मान या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रम राबविण्यात आले.

जिल्हा परिषद केंद्रीय शाळा व उर्दू शाळा, वेळापूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनाही खाऊचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी तक्षशिला बुद्ध विहार परिसरात मान्यवरांच्याहस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले.

यावेळी शिक्षण व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. आदर्श मुख्याध्यापक आर. बी. पवार सर, आदर्श शिक्षक नामदेव बावचे सर, आदर्श क्रीडा शिक्षक सतीश कदम सर तसेच MPSC परीक्षेतून STI अधिकारी म्हणून निवड झालेले रणजीत भोरजे यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षकवृंद, युवक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

राजाभाऊ सरवदे हे वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने भूमिका मांडणारे तसेच आंबेडकरी विचारांची चळवळ गावागावात पोहोचविण्यासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘शिक्षणाला बळ, पर्यावरणाला आधार आणि कर्तृत्वाला सन्मान’ हा सामाजिक संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button