Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

माजी उपमुख्यमंत्री श्री.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते “श्री हनुमान” मंदिराचे भूमिपूजन संपन्न

Talk18 मराठी l 07 जुलै l सदाशिवनगर :

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर आणि श्री शंकर सहकारी साखर कारखाना सेवक कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या श्री हनुमान मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि सौ.नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते धार्मिक वातावरणात संपन्न झाला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सौ.कांचनमालादेवी मदनसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, सौ.सत्यप्रभादेवी माजी आमदार तथा चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील व सौ.शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील व पंचायत समिती सदस्या सौ.वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिवामृत दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, सूतगिरणी व विविध विकास सोसायट्यांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मंदिराच्या बांधकामाचे शिल्पकार दीपक मायाचार्य यांचा कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजीत डुबल, अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव जपणाऱ्या या मंदिराच्या उभारणीमुळे सदाशिवनगर परिसरात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button