
Talk18 मराठी l शुक्रवार 14 ऑगस्ट :
चांदापुरी प्रतिनिधी : चांदापूरी येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते समाधान साबळे यांचे वडील भागवत निवृत्ती साबळे यांचे आज शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता वयाच्या 61 व्या वर्षी बारामती येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
भागवत निवृत्ती साबळे यांच्यावर उपचार सुरू असताना पॅरालिसिसच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने साबळे कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर आज दुपारी ३ वाजता चांदापुरी येथील राहत्या घरी अंत्यविधी करण्यात येणार आहे.
या दुःखद प्रसंगी सर्व नातेवाईक, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Talk18 मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!


