Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

चांदापुरीच्या भूमिपुत्राची वैद्यकीय क्षेत्रात भरारी; डॉ. आर्यन पाटील यांचे घवघवीत यश

Talk18 मराठी l १३ जून २०२६ l शनिवार

चांदापुरी (ता. माळशिरस) :

चांदापुरी गावचे भूमिपुत्र तथा शंकर सहकारी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक,चांदापुरी गावचे जेष्ठ नेते केशवराव पाटील ( लिंगा पाटील ) यांचे नातू चि. डॉ. आर्यन शिवाजीराव पाटील यांनी M.B.B.S. (मुंबई) पदवी अव्वल मानांकनासह प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

डॉ. आर्यन यांच्या या यशामुळे चांदापुरी गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले असून, त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाचा, गावाचा आणि परिसराचा नावलौकिक उंचावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याप्रसंगी डॉ. आर्यन पाटील यांचे तसेच त्यांचे वडील शिवाजीराव पाटील व संपूर्ण पाटील परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ. आर्यन यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यातही त्यांनी समाजसेवेसह अधिक उंच शिखरे गाठावीत, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

— आण्णा भोसले

संपादक, Talk18 मराठी 🌹💐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button