
दिनांक : ३० जून २०२६ | वार : मंगळवार
श्रीपूर | Talk18 मराठी प्रतिनिधी:
राजरत्न नाईकनवरे मित्र परिवार व जिगरबाज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूरचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक तथा महाराष्ट्र राज्य एम.डी. असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सुपंत चषक पर्व – ६ वे’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना ट्रॅक्टर गार्ड येथे पार पडणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी ₹२०,००० निश्चित करण्यात आली असून, परिसरातील क्रिकेटप्रेमी संघांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹१,००,००० व भव्य चषक, द्वितीय क्रमांकासाठी ₹५०,००० व भव्य चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी ₹२५,००० व भव्य चषक देण्यात येणार आहेत.
याशिवाय, “स्पर्धेतील विजेत्या संघाच्या मालकास आयोजकांकडून आकर्षक टू-व्हीलर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.” तसेच प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचला टी-शर्ट देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी संघ नोंदणीची अंतिम तारीख १० जुलै २०२६ असून, इच्छुक संघांनी आयोजकांशी संपर्क साधून वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक राजरत्न नाईकनवरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आयोजक राजरत्न नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मोबाईल क्रमांक -९८९०९९८६८८


