
Talk18 मराठी l शनिवार, १२ सप्टेंबर :
शिवराज पुकळे युवाशक्तीच्या वतीने गुरुजनांचा सन्मान करणाऱ्या ‘शिवनेरी दहीहंडी उत्सव २०२६’ चे आयोजन शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आर्वे मैदान, पिलीव, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे व पिलीव पंचायत समिती सदस्या सौ. नम्रता शिवराज पुकळे यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे या दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन सर्व गुरुजनांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

उत्सवातील प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये असून ते रणजितदादा समर्थक भैय्यासाहेब मोरे व शाखाभाऊ कर्चे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. ७७ हजार ७७७ रुपयांचे आकर्षक बक्षीस धनाजी (भाई) सुळे, पै. बाबासाहेब पुकळे व अण्णासाहेब सुळ पाटील यांच्या वतीने, तर ५५ हजार ५५५ रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस रमेशभाऊ सरवदे व वरुणदादा धाईंजे यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
दहीहंडी उत्सवात लॉडली डीजे, पेपर ब्लास्ट, प्राईम ऑडिओ, एम.के. लाईट पंढरपूर, क्रेन सर्विस सांगोला व साई एलईडी स्क्रीन ही प्रमुख आकर्षणे असणार आहेत. तसेच दिपाली पुणेकर व ग्रुप आणि निशा मुंबईकर व ग्रुप यांच्या बहारदार नृत्याची मेजवानी उपस्थितांना मिळणार असून, कार्यक्रमाचे निवेदन माणदेशी निवेदक ‘आवाजाचा बादशाह’ लखनराज खांडेकर करणार आहेत. त्यामुळे पिलीव परिसरात या भव्य दहीहंडी उत्सवाची उत्सुकता निर्माण झाली आहे.


