आमदार उत्तमराव जानकरांकडून नूतन नगराध्यक्षा रेशमाताई अडगळे व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार

Talk18 मराठी /आण्णा भोसले वेळापूर:अकलूज नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर नूतन नगराध्यक्षा सौ. रेशमाताई अडगळे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते “गरुड बंगला “वेळापूर येथे यथोचित सत्कार करण्यात आला.
— यावेळी नूतन नगरसेवक शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार गटाच्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्याबद्दल तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचे आभार व्यक्त केले.
या भेटीदरम्यान आमदार जानकर यांनी नूतन नगराध्यक्षा व नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अकलूज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व नागरी प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासात्मक निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले.यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.— Talk18 मराठी


