
Talk18 मराठी l ३१ ऑगस्ट सोमवार
अकलूज : मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर उदयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अवधूत कांबळे साहेब यांच्या कन्या गायत्री ऊर्फ हर्षा अवधूत कांबळे हिने एम. फार्मसीची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत मानाचा तुरा रोवला आहे.
एम. फार्मसीसारख्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून गायत्री ऊर्फ हर्षा कांबळे यांनी आपल्या कुटुंबीयांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामागे त्यांनी घेतलेली मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि मिळालेल्या कौटुंबिक प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे.
हर्षाच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस उत्तरोत्तर यश मिळो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.


