विशेष

चांदापुरी विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीमती सुमन सुखदेव पाटील यांची निवड

Talk18 मराठी आण्णा भोसले :

चांदापुरी (ता. माळशिरस) येथील चांदापुरी विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीमती सुमन सुखदेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली.

ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एस. के. यादव यांच्या अध्यक्षतेखाली शांततापूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते. संचालक मंडळामध्ये भीमराव डेरे, तनवीर पठाण, बापू लोखंडे, जयवंत सूळ, बलभीम काळे, विजय काळे, दोहातखान पठाण, अर्चना मदने तसेच मावळते चेअरमन सर्जेराव कोपनर यांचा समावेश होता.

निवडणुकीच्या वेळी भजनदास चोरमले, विजय पाटील, आप्पा पाटील, विलास धुलूगडे, तानाजी कोपनर, जयवंत पूकळे, शिवाजी पाटील, बाळू मदने, नितीन सरक, प्रमोद मगर, सागर लोखंडे, अशोक सोनवणे, राजू पाटील यांच्यासह चांदापुरी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सोसायटीचे सचिव अजित हनुमंत लोखंडे, सहसचिव हनुमंत लोखंडे तसेच शिपाई अजिनाथ कवळे उपस्थित होते. नव्याने निवड झालेल्या चेअरमन श्रीमती सुमन सुखदेव पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button