महाराष्ट्र

चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार साखर कारखाना युनिट, 1चा ३ लाख मे. टन गाळपाचा ऐतिहासिक टप्पा

माळशिरस (प्रतिनिधी) –
ओंकार साखर कारखाना प्रा. लिमिटेड, युनिट क्रमांक ०१ चांदापुरी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) यां कारखान्याने गळीत हंगाम २०२५–२६ मध्ये ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
हा टप्पा गाठण्यात कारखान्याचे चेअरमन श्री. बाबुराव बोत्रे पाटील यांचे सक्षम नेतृत्व, दूरदृष्टीपूर्ण निर्णय व शेतकरी हिताला प्राधान्य देणारे धोरण मोलाचे ठरले आहे. गळीत हंगामात शिस्तबद्ध नियोजन, वेळेत ऊस उचल तसेच तोडणी व वाहतूक यंत्रणेवर योग्य नियंत्रण ठेवण्यात आल्याने कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली.
या यशामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. चेअरमन श्री. बाबुराव बोत्रे पाटील यांनी या यशाचे श्रेय शेतकरी, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिले असून, पुढील काळातही शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून कारखान्याचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button