माळशिरस तालुका शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी पिलीवच्या स्मितादेवी जामदार यांची नियुक्ती

Talk18 मराठी प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सौ. स्मिता देवी रणधीर सिंह जामदार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील महिला आघाडीला नवे बळ मिळणार आहे.
पर्वा झालेल्या विशेष कार्यक्रमात सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. आरती ओंकार बसवंती यांच्या हस्ते तसेच माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती दत्ता भैय्या मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी बापूसाहेब मगर, नानासाहेब मदने, मोहसीन शेख, तानाजी भाऊ लोखंडे, रणधीर सिंह जामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी स्मितादेवी जामदार यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून स्मितादेवी जामदार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरातून पाठिंबा व्यक्त केला जात आहे. अनेकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अधिक सक्षम होऊन गावपातळीपासून संघटन मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे।
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून सौ. स्मिता देवी जामदार या महिला आघाडीचे संघटन अधिक सक्षम करत समाजकारणात सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
त्यांच्या निवडीमुळे पिलीवाणी परिसराती


