
२९ ऑगस्ट 2026 l शनिवार
Talk18 मराठी प्रतिनिधी :कुसमोड
रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, सामाजिक बांधिलकी, आपुलकी आणि माणुसकीची नाती अधिक घट्ट करणारा सण आहे. याच भावनेतून कुसमोड गावचे युवा नेते रणजीत पाटील यांनी आदिवासी समाजातील भगिनींसोबत रक्षाबंधन साजरे करत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

यावेळी आदिवासी भगिनींनी रणजीत पाटील यांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली. पाटील यांनीही भगिनींच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहण्याचा आणि त्यांच्या अडचणींमध्ये मदतीचा हात देण्याचा विश्वास व्यक्त केला.
समाजातील विविध घटकांमध्ये आपुलकी, बंधुभाव आणि समानतेची भावना निर्माण व्हावी, तसेच सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक नाती अधिक दृढ व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी भगिनींसोबत रक्षाबंधन साजरे करून रणजीत पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमामुळे उपस्थित भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ‘रक्ताचे नाते नसले तरी माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकांचे भाऊ-बहिण आहोत,’ हा संदेश या रक्षाबंधन सोहळ्यातून देण्यात आला.


