Uncategorizedअकलूजमहाराष्ट्रविशेष

पालकमंत्र्यांना काँग्रेसचा टोला; सात रस्त्यावरील पोस्टरची चर्चा

Talk18 मराठी प्रतिनिधी सोलापूर :

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विराजमान झाल्याने भाजपने जिल्ह्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. यावेळी स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे हेही जिल्हा परिषदेत उपस्थित होते. यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेवर एकहाती सत्ता आणत भाजपने राजकीय वर्चस्व सिद्ध केले असून, या यशामागे पालकमंत्री गोरे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आपली भूमिका ठळकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लक्ष्य करत सोलापुरातील सात रस्ता परिसरात एक चर्चेचा विषय ठरलेले पोस्टर लावले आहे.

या पोस्टरद्वारे मान तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती विक्रम शामराव शिंगाडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या असल्या, तरी त्यामधील मजकूर राजकीय टोला म्हणून पाहिला जात आहे.

👉 “आपनी ताकद पर इतना घमंड मत करना… माना की आज तुम बलवान हो, लेकिन याद रखना… समय आपसे भी बड़ा बलवान होता है!”अशा शब्दांत चेतन नरोटे यांनी पालकमंत्री गोरे यांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सोलापूर शहरात या पोस्टरची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, आगामी राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button