
Talk18 मराठी l 27ऑगष्ठ गुरुवार :
माळशिरस | प्रतिनिधी :माळशिरस येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देऊन तिचा विकास करण्यात यावा, या मागणीसाठी लिंगायत समाज संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या मागणीला अखेर यश मिळाले असून, दफनभूमीच्या विकासासाठी ₹५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून दफनभूमीच्या आवश्यक विकासकामांना सुरुवात करण्यात येणार असून, त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला,
भूमिपूजन सोहळ्यास सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती मा. सौ. संस्कृती सातपुते, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. आप्पासाहेब देशमुख, विद्यमान नगराध्यक्ष मा. श्री. रघुनाथ चव्हाण तसेच माळशिरस नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

समाजाच्या या महत्त्वपूर्ण मागणीसाठी माजी आमदार राम सातपुते, मा.ग्रामविकासमंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे ,माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर,माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख आणि लिंगायत समाजाचे युवा नेते शितल नंदकुमार गुजरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे वीरशैव लिंगायत समाजाचा दफनभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
यावेळी मा. श्री. शिवदास गुजरे, मा. श्री. रविराज वाणी, मा. श्री. कथले सर, मा. श्री. गणेश गुजरे यांच्यासह मोठ्या संख्येने वीरशैव लिंगायत समाजबांधव उपस्थित होते,

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा विजय केवळ एका मागणीचा नसून, समाजाची एकजूट, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि संघर्षाच्या बळाचा विजय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण कार्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे, नगरसेवकांचे आणि समाजबांधवांचे वीरशैव लिंगायत समाज संघटना, माळशिरस शहर यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


