Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

यशवंत सेनेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी विजय गाडे यांची नियुक्ती

Talk18 मराठी l माळशिरस प्रतिनिधी :

यशवंत सेनेच्या माळशिरस तालुका कार्यकारिणीची नियुक्ती नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा समितीच्या बैठकीत करण्यात आली. यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब दोडतले साहेब, माजी राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार तसेच मा. आण्णासाहेब रुपनवर आणि मा. नितीनदादा धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली.

या बैठकीत मा. विजय कुंडलिक गाडे (चौंडेश्वरवाडी) यांची यशवंत सेना माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश हनुमंत वाघमोडे आणि सोलापूर जिल्हा सरचिटणीस मा. शीतल नंदकुमार गुजरे यांच्या हस्ते विजय गाडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली.

यावेळी मा. सुहास सीद, मा. चंद्रकांत गुलाब धांडोरे (उदयनगर), मा. संतोष वाघमारे (उदयनगर), मा. राजेंद्र मोहन कांबळे (अकलूज), मा. मनोज मधुकर निकम (आनंदनगर), मा. हनुमंत निवृत्ती बनसोडे (मंगळवेढा), मा. संजय मस्के, मा. भैयासाहेब शिंदे, मा. उमेश शिंदे, मा. धनाजी आडके, मा. सुनील गायकवाड यांच्यासह यशवंत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय गाडे यांच्या नियुक्तीमुळे माळशिरस तालुक्यात यशवंत सेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

विजय कुंडलिक गाडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button