पिसेवाडी येथे शिवजयंती निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा; तालुक्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती

Talk18 मराठी :
माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही स्पर्धा शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ते रविवार 01 मार्च 2026 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार आहे.
🏆 आकर्षक पारितोषिके जाहीर
🥇 प्रथम पारितोषिक – 30,001 रुपये
🥈 द्वितीय पारितोषिक – 20,001 रुपये

या स्पर्धेला माळशिरस तालुक्यातील प्रमुख राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा पिसेवाडी ग्रामपंचायत सदस्य साहिल भैय्या आत्तार यांनी जास्तीत जास्त क्रिकेट मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपली गुणवत्ता दाखवून द्यावी आणि क्रीडा संस्कृतीला चालना द्यावी, असा संदेशही त्यांनी दिला आहे.
या भव्य स्पर्धेचे आयोजन श्री संत बाळूमामा मंदिर समिती, जानकरवस्ती पिसेवाडी तसेच स्थानिक मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
📍 स्थळ: पिसेवाडी, पुणे–पंढरपूर हायवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर
क्रिकेट प्रेमी आणि तालुक्यातील क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


