सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप! कोलंबिया निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून कुमार आशीर्वाद यांची निवड

सोलापूर | Talk18 मराठी प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जबाबदारीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी Chockalingam Sethuraman यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ 6 ते 10 मार्च 2026 दरम्यान Colombia येथे अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे.
या शिष्टमंडळाला Consejo Nacional Electoral (कोलंबियाचा राष्ट्रीय निवडणूक आयोग) यांच्याकडून 8 मार्च रोजी होणाऱ्या काँग्रेस निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या Election Commission of India च्या Global Engagement for Electoral Excellence (GEEE) या उपक्रमांतर्गत ही महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात कुमार आशीर्वाद यांच्यासह मनोहर रामचंद्र पारकर (संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी), प्रीयेश महाजन (निवडणूक नोंदणी अधिकारी, रामटेक) आणि सागर शिर्के (बूथ लेव्हल अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.
या दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय निवडणूक व्यवस्थेचा पारदर्शक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह अनुभव जागतिक स्तरावर मांडणे तसेच कोलंबियातील निवडणूक प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणे हा आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत गौरवास्पद बाब असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची या आंतरराष्ट्रीय निरीक्षण मोहिमेसाठी झालेली निवड ही केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान आहे. भारतीय निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेला मिळालेली ही जागतिक मान्यता मानली जात आहे.
Talk18 मराठी
आपल्या जिल्ह्याचा आवाज, जागतिक स्तरावरही दुमदुमतोय!


