Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

अकलूजमध्ये अत्याधुनिक आरोग्यसेवेची भरारी; लेझर, कॉस्मेटिक व प्लास्टिक सर्जरी युनिटचे खा. मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Talk18 मराठी l सोमवार १७ ऑगस्ट 2026 :

अकलूज, दि. १६ (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.

अकलूज येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या लेझर, कॉस्मेटिक स्किनरोग, प्लास्टिक सर्जरी युनिट तसेच अॅपेक्स ऑबेसिटी क्लिनिक या आधुनिक आरोग्यसेवा केंद्राचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

यावेळी बोलताना मोहिते-पाटील म्हणाले की, अकलूज व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, वजनवाढ तसेच विविध त्वचारोग व सौंदर्यविषयक समस्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार उपलब्ध होणे गरजेचे आहे.

मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा आता ग्रामीण भागातही उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि त्रास कमी होण्यास मदत होईल. स्थानिक पातळीवर दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने अकलूजसह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आधुनिक आरोग्यसेवा केंद्राच्या माध्यमातून लेझर उपचार, कॉस्मेटिक स्किनरोग उपचार, प्लास्टिक सर्जरी तसेच लठ्ठपणा व वजन व्यवस्थापनासंदर्भातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

उद्घाटन कार्यक्रमास डॉ. एम. के. इनामदार, डॉ. ज्योती बालेराव-राजे, डॉ. राजीव राणे, डॉ. विद्युत शहा, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत राजेमोसले यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमास डॉ. एम. के. इनामदार, डॉ. ज्योती बालेराव-राजे, डॉ. राजीव राणे, डॉ. विद्युत शहा, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत राजेमोसले यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button