
Talk18 मराठी l आण्णा भोसले :
अकलूज :अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने विना परवाना अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्रे, जिवंत काडतुसे तसेच टाटा नेक्सॉन कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
प्रेस नोटनुसार, विना परवाना अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या ०६ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन ९०,४९,०००/- रुपये किंमतीचे ७७ अग्निशस्त्रे, ४७ जिवंत काडतुसे व ८,००,०००/- रुपयांची टाटा नेक्सॉन कार असे एकूण ९८,४९,०००/- रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी गु.र.नं. ५६०/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३,५, २५ सह बी.एन.एस कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (९) (३), १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाईमध्ये पोहेकॉ/१५६८ शिवकुमार रेणप्पा मदभावी ने अकलूज पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. गुन्हा घडण्याची वेळ दि. १४/०८/२०२६ रोजी १७.१० वा. असून गुन्हा दाखल करण्याची वेळ दि. १४/०८/२०२६ रोजी २१.१० वा. अशी आहे. माहिती प्राप्त अंमलदार म्हणून पोहेकॉ/१६२३ श्रीराम दिनेश पारे यांचा उल्लेख आहे.
ही कारवाई मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण; मा. श्री. विजयस कुमार, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण; मा. श्रीमती प्रेरणा कट्टे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पंढरपूर विभाग; मा. श्री. संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक निजर उबाळे, अकलूज पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम तसेच पोहेकॉ/१६२६ श्रीराम दिनेश पारे, पोहेकॉ/१५६८ शिवकुमार रेणप्पा मदभावी, पोहेकॉ/२११ राहुल सुभाष एण्णावे, पोहेकॉ/१७८ अमोल मोहन बकाले, पोहेकॉ/१४०७ समीर लतीफ पठाण, पोका/११७७ बलरामचंद्र पांडुरंग खरात, पोका/१५१ रणजित राजेंद्र जगताप, पोका/६९९ तुकाराम शिवाजी माने देशमुख, पोका/६७ विजय शशिकांत ताटे यांचा सहभाग होता.
याचप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या पथकातील सपोफो शरद कदम, पोहेकॉ/३६ सुरज हेंबाडे, पोहेकॉ/१६५९ अनिल महादेव शिंदे, पोहेकॉ/९१४ स्वप्नील गायकवाड, पोका प्रविण मेटकरी सायबर पोलीस ठाणे यांनीही कारवाईत सहभाग घेतला.
अटक आरोपी१) विकास कैलास वजाटे वय ३१ वर्षे रा. परिते ता. माढा जि. सोलापूर२) राहुल सतीश माने वय ३४ वर्षे रा. वसंतदादा हौसिंग सोसायटी, माजी सैनिक वसाहत, मिरज जि. सांगली३) शनि भारत बनसोडे रा. अकोले खुर्द ता. माढा जि. सोलापूर४) महादेव बाळासाहेब कोरके वय २० वर्षे रा. कोरके वस्ती, करकंब ता. पंढरपूर जि. सोलापूर५) प्रदिप पांडुरंग माने रा. पिक महुद ता. सांगोला जि. सोलापूर६) विजय सदाशिव किरणी वय ३४ वर्षे रा. शिवनगर ता. आटपाडी जि. सांगली, आटपाडी जि. बेळगाव राज्य कर्नाटक७) अनिल पंचलाल मेहता वय ३२ वर्षे रा. रांजणगाव ता. वरला जि. बडवानी राज्य मध्यप्रदेश८) सुमित नाना लवटे वय २१ वर्षे रा. भुईटे वस्ती, सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर


