Uncategorizedअकलूजआर्थिकमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

शिवसेनेच्या माळशिरस तालुका संपर्कप्रमुख पदी विजय (भाऊ) कोकणे यांची निवड

Talk18 मराठी l आण्णा भोसले :

माळशिरस तालुक्यातील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते विजय भाऊ कोकणे यांची युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून शिवसेना माळशिरस तालुका संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे माळशिरस तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे तसेच युवासेना सचिव किरण साळी यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जाहीर करण्यात आले. विजय भाऊ कोकणे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत असून त्यांच्या कामाची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात माळशिरस तालुक्यात शिवसेना संघटन अधिक बळकट करण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button