मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत युवा नेते बाबासाहेब माने पाटील यांची सदिच्छा भेट

Talk18 मराठी l आण्णा भोसले :
मुंबई : महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री Uday Samant यांच्या मैत्री कक्ष कार्यालयात पंचायत समिती सदस्य मा. श्री. बाबासाहेब माने पाटील यांनी सदिच्छा भेट देत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. ही भेट अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचे समजते.
या प्रसंगी मा. श्री. उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खंडू तात्या कळसुले, अभिजीत तरंगे, सुयोग दुधाळ, विश्वजीत माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भेटीदरम्यान स्थानिक पातळीवरील विकासकामे, नागरिकांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय झाला. विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, औद्योगिक विकास आणि युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मा. श्री. बाबासाहेब माने पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध समस्या मांडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावर मंत्री उदय सामंत यांनी सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीमुळे प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, विकासाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


