Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

मनोज जरांगे पाटील यांना भानुदास सालगुडे पाटील यांचे निवेदन; श्रीपूर-शिवपुरी एमआयडीसी विस्ताराला गती देण्याची मागणी

Talk18 मराठी l 29 जून 2026 प्रतिनिधी :

माळशिरस तालुक्यातील श्रीपूर एमआयडीसी व शिवपुरी एमआयडीसीच्या विस्तारासह पायाभूत सुविधा प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याची मागणी माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आंतरवाली सराटी येथे मनोजदादा जरांगे यांना भेटून (28 जून रोजी) भेटून निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व अवर्षणप्रवण भागातील शेतकरी आणि उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी श्रीपूर व शिवपुरी एमआयडीसीचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रादेशिक कार्यालय, सोलापूर यांच्या माध्यमातून दोन्ही एमआयडीसींच्या विस्तार व पायाभूत सुविधा प्रस्तावांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

श्रीपूर एमआयडीसीसाठी प्रमुख मागण्या५०० एकर जागेत लॉजिस्टिक पार्क उभारणे.५०० एकर जागेत फूड व ॲग्रिकल्चर पार्क विकसित करणे.२०० एकर जागेत ट्रक टर्मिनल, वेअरहाऊसिंग व कोल्ड चेन सुविधा उभारणे.५० एकर जागा राखीव ठेवून “सोलापूर केळी शुद्धीकरण व कापणीनंतर प्रक्रिया केंद्र” सुरू करणे.

शिवपुरी एमआयडीसीसाठी प्रमुख मागण्या५०० एकर विस्तार करून एमएसएमई व अभियांत्रिकी क्लस्टरसाठी तातडीने भूसंपादन करणे.१०० एकर जागेत डेअरी क्लस्टर उभारणे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, दोन्ही एमआयडीसींच्या विस्तार व पायाभूत सुविधा प्रस्तावांना मंत्रालय स्तरावरून १५ दिवसांत मंजुरी मिळावी.

सध्या माळशिरस तालुक्यात २५ हजारांहून अधिक सुशिक्षित बेरोजगार असून, दोन्ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ५ हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि १५ हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्यासही मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

निवेदनात आणखी नमूद करण्यात आले आहे की, या दोन्ही एमआयडीसी परिसरातील गावांमध्ये सुमारे ६० टक्के मराठा समाज वास्तव्यास असून, उद्योगवाढीमुळे स्थानिक तरुणांना रोजगार व नवीन उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. शासनाची जमीन उपलब्ध असल्यामुळे जमीन खरेदीची गरज भासणार नसून शासनावर अतिरिक्त आर्थिक भारही पडणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

शेवटी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष भानुदास साळगुडे पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button