Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

अनकढाळ टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एक आरोपी अटकेत

सांगोला| शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६

Talk18 मराठी प्रतिनिधी :

महाराष्ट्र पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक आचारसंहिता २०२६ च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची विशेष कारवाई, मौजे अनकढाळ गावाच्या हद्दीत मिरज ते सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ अनकढाळ, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे अवैध बनावट देशी व परराज्यातील विदेशी मद्य, वाहतुकीविरुद्ध कारवाई करून १ आरोपी अटक, १ कंटेनरसह जप्त करत सुमारे ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मा. आयुक्त सो राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, डॉ. राजेश देशमुख तसेच मा. श्री सागर धूमकर साहेब, विभागीय उपायुक्त, पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर व श्री सौरभ बा. अदाटे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सौरभ भोसले दुय्यम निरीक्षक पंढरपूर क्र. २ (सांगोला) यांनी केलेली कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये एक टाटा कंपनीचा ६ चाकी कंटेनर जिचा वाहन क्र. एनएल ०१ एई ६८२३ त्यामध्ये एकूण बनावट देशी मद्य ९० मिली क्षमतेचे १०७१ बॉक्स एकूण १०७१०० बाटल्या त्याची एकूण किंमत ४२,८४,०००/- व परराज्यातील विदेशी मद्य १८० मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीचे १२ बॉक्स त्याची एकूण किंमत १,५५,५२०/- एक मोबाईल तसेच कंटेनर यांची एकूण मुद्देमाल किंमत ८४,०९,५२०/- मिळून आला आहे.

सदर कारवाई मा. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पंकज कुंभार पंढरपूर विभाग, दुय्यम निरीक्षक श्री सौरभ भोसले, श्री. समाधान शेळके, श्री. राम निंबाळकर, श्री बापू चव्हाण, श्रीमती श्रद्धा गडदे तसेच जवान सर्वश्री. विजय शेळके, विनायक वाळुंजकर, तानाजी जाधव, गजानन जाधव, ए बी दशवंत, योगेश पाटील, प्रवीण पुसावळे, देविदास चौधरी, संजय पराडे जवान नि वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली असून सदर गुन्ह्याचा तपास श्री. सौरभ भोसले दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पंढरपूर क्र. २ हे करीत आहेत.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांनी या निमित्ताने अवैध व्यावसायिकांना कडक शब्दात इशारा दिला आहे की, “जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध मद्य धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. ग्रामीण आणि शहरी भागात गस्त वाढवण्यात आली असून, यापुढेही अशीच कडक कारवाई सातत्याने सुरू राहील. जे लोक या अवैध व्यवसायात आढळतील, त्यांच्यावर अजामीनपात्र कलमान्वये गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर पावले उचलली जातील.

”आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास त्याची माहिती तात्काळ विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button