
खुडूस | प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यातील खुडुस येथील रहिवासी तथा Talk18 मराठीचे संपादक आण्णा भोसले यांचे भाचे, कु. अक्षय ऊर्फ दत्तात्रय कांबळे (वय २६ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. २७ जुलै २०२६ रोजी ) सांगली येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने खुडुससह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अत्यंत मनमिळावू, नम्र व सर्वांशी आपुलकीने वागणारा तरुण म्हणून अक्षय कांबळे यांची ओळख होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दिवंगत अक्षय कांबळे यांच्यावर दि. २८ जुलै २०२६ रोजी त्यांच्या मूळ गावी खुडुस, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.
अक्षय यांच्या अकाली निधनामुळे खुडुस गावासह संपूर्ण परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
Talk18 मराठी परिवाराकडून दिवंगत अक्षय कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. 🙏💐


