भारत–UAE संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची नियुक्ती

Talk18 मराठी प्रतिनिधी –
१८व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी भारताच्या संसदेत स्थापन करण्यात आलेल्या भारत–संयुक्त अरब अमिराती (UAE) संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संसदीय तसेच राजनैतिक संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या मैत्री समितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारत आणि UAE यांच्यात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध क्षेत्रांत मजबूत आणि घनिष्ठ संबंध आहेत. संसदीय मैत्री गटाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक प्रभावीपणे वाढण्यास मदत होणार आहे
या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले,
“भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी संसदीय स्तरावर सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका बजावण्याचा मी प्रयत्न करेन. ही जबाबदारी दिल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो.”
ही नियुक्ती त्यांच्या संसदीय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाची जबाबदारी मानली जात असून, त्यांच्या मतदारसंघासाठीही हा अभिमानाचा क्षण ठरत आहे.


