
Talk18 मराठी l वेळापूर प्रतिनिधी :
माढा लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून संघटन बांधणीला वेग देण्यात आला असून, पदाधिकारी निवड आढावा व BLA नोंदणी अभियान दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माळशिरस व सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा मेळावा ठरणार आहे.
बुधवार, २७ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता वेळापूर येथील शिवशंभो मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असून, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्याद्वारे बूथ स्तरावरील संघटन मजबूत करणे, BLA नोंदणी मोहिमेला गती देणे आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा राजकीय मतदारसंघ मानला जातो आणि येथे आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस पंचायत समितीचे सभापती पै. दत्ता भैय्या मगर यांनी केले आहे.


