तरंगफळ परिसरातील शेतकऱ्यांकडून फटाक्यांची आतषबाजी; श्रीफळ फोडून पहिल्या दोन ट्रॅक्टरचे प्रस्थान
Talk18 मराठी तरंगफळ | प्रतिनिधी
गेल्या वर्षी शेतकऱ्यांना चांगला दर देऊन वेळेत ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यामुळे श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर यांच्याकडे तरंगफळ परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस पाठविण्यास उत्साहाने सुरुवात केली आहे. यानिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करून आणि श्रीफळ फोडून तरंगफळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. गोरख मारुती जानकर यांचे पहिले दोन ट्रॅक्टर कारखान्याकडे मार्गस्थ करण्यात आले.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार तथा कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे. बंद पडलेला कारखाना सुरळीत करून शेतकऱ्यांचे हित जपण्याचे काम करण्यात आल्याने श्री शंकर कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकरी उत्सुक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी माजी सरपंच श्री. महादेव उत्तमराव तरंगे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून ऊस वाहतुकीच्या पहिल्या दोन ट्रॅक्टरचे प्रस्थान करण्यात आले.
याप्रसंगी बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. सुजित तरंगे, उपसरपंच श्री. गोरख जानकर, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष श्री. सर्जेराव तरंगे, प्रगतशील युवा बागायतदार कुलदीप जानकर, उद्योजक गणेश तरंगे, कालिदास नरळे, आप्पा तरंगे पाटील, जेसीबी व्यावसायिक बाळासाहेब तरंगे, ग्रामपंचायत सदस्य विलास तरंगे, राहुल पाटील, उमाजी बोडरे आदी उपस्थित होते.




