Uncategorized
तरंगफळ जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष–उपाध्यक्षांची निवड

तरंगफळ (प्रतिनिधी | Talk18 मराठी)तरंगफळ जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दामोदर दत्तू कांबळे तर उपाध्यक्षपदी सौ. रुपाली अर्जुन साळवे यांची निवड झाल्याबद्दल माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सरपंच नारायण तात्या तरंगे, वकील धनाजी ठवरे, सुजित तरंगे, दिव्यांग संघटनेचे नेते गोरख जानकर, माजी उपसरपंच सतीश कांबळे, शशिकांत साळवे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला.


