दत्ता (नाना) मगर यांची सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना,नूतन संचालकपदी निवड

Talk18 मराठी प्रतिनिधी :
मोहिते पाटील परिवाराशी कायम एकनिष्ठ राहून सहकार,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले दत्ता (नाना) मगर यांची सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर, अकलूजच्या संचालकपदी निवड झाल्याने निमगाव मगर परिसरासह कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोहिते पाटील परिवार आणि निमगाव मगर गावाचे संबंध हे अनेक वर्षांपासून अतिशय जिव्हाळ्याचे व विश्वासाचे राहिले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता नाना मगर यांनी नेहमीच विधायक कार्य केले आहे.त्या कार्याची पावती म्हणून दत्ता (नाना) मगर यांच्यावर संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दत्ता (नाना) मगर यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क ठेवला आहे. त्यांच्या निवडीमुळे कारखान्याच्या विकासकामांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


