अकलूजमध्ये अत्याधुनिक ‘कार्डियाक कॅथलॅब’चे लोकार्पण; हृदय उपचारांना मिळणार नवे बळ

अकलूज (प्रतिनिधी | Talk18 मराठी):
अकलूज शहरातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडत असून, ‘शिर्के सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ येथे अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब (Cardiac Cath Lab) चे भव्य उद्घाटन रविवार, दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या अत्याधुनिक सुविधेमुळे हृदयविकारांवरील उपचार आता अकलूज परिसरातच उपलब्ध होणार असून, रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार आहे. विशेष म्हणजे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसह 24 तास कार्डियाक इमर्जन्सी सेवा आणि अत्याधुनिक ICU सुविधा यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील हे असणार आहेत. तसेच उद्घाटक म्हणून प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, डॉ. अनिल शिर्के, तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमामागे डॉ. सचिन शिर्के (Consultant & Interventional Cardiologist) आणि डॉ. चैताली शिर्के (Consultant Ophthalmologist) यांचे विशेष प्रयत्न असून, अकलूजमध्ये उच्चस्तरीय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न मानला जात आहे.
अकलूज आणि माळशिरस तालुक्यासाठी ही आरोग्य क्षेत्रातील मोठी झेप मानली जात असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


