Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

अस्लम मुजावर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग सोलापूर जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड

Talk18 मराठी :आण्णा भोसले :

माळशिरस येथील हॉलीबॉल क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू अस्लमभाई मुजावर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) अल्पसंख्याक विभागाच्या सोलापूर जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, अस्लम मुजावर हे खासदार मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, त्यामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

राजकारणासोबतच अस्लम मुजावर यांनी क्रीडा क्षेत्रातही आपली ठसठशीत छाप पाडली आहे. ते हॉलीबॉल क्षेत्रातील राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असून, त्यांच्या या दुहेरी ओळखीमुळे तरुणांमध्ये विशेष प्रेरणा निर्माण झाली आहे.

सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या सक्रिय कार्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक विभाग अधिक संघटित होऊन पक्षवाढीस नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निवडीबद्दल सर्वच घटकातील समाज बांधवांनी अस्लम मुजावर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत स्वागत केले आहे. विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button