शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेव यात्रेची तयारी; सभापती दत्ताभैय्या मगर यांची पाहणी

Talk18 मराठी प्रतिनिधी :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेनिमित्त यंदा प्रशासनाने पूर्वतयारीला गती दिली असून भाविकांच्या सोयीसुविधांसाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोथळे, कारुंडे, पिंपरी तसेच मुंगीघाट परिसरात प्रत्यक्ष पाहणी दौरा पार पडला.
या पाहणीदरम्यान आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांची सखोल तपासणी करण्यात आली.

यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता भैय्या रावसाहेब मगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाहणी दौरा पार पडला. त्यांनी सर्व विभागांनी समन्वय साधून कार्य करावे तसेच यात्रेसाठी सक्षम व सुयोग्य व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले.
यावेळी गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, आरोग्य सेवा विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शिवसेना तालुकाध्यक्ष सतिश सपकाळ उपस्थित होते.यात्रा काळात प्रशासन पूर्णतः सज्ज असून भाविकांना सुरक्षित व सुरळीत सुविधा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


